मराठवाड्यातील 40 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करू शकणारा आणि सुमारे ६ हजार कोटींची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असलेल्या जालना येथील सिड पार्कची उभारणी कृषी विभागाकडून होणार असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून ( एम.आई.डी.सी.) त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. असा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 109.30 कोटी गुंतवणुकीचा सिड पार्क जालना परिसरात उभारण्याची मान्यता देण्यात आली होती. जालना जिल्ह्यात 20 हजार शेतकरी बिजोत्पादानात असून त्यांना वार्षिक सुमारे 250 कोटींचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे. तसेच मजुरांना प्रतिवर्षी 150 कोटींचा रोजगार मिळत आहे. आणि ह्या प्रकल्पामुळे जालना परिसरातील बियाणे उद्योगाची उलाढाल दुप्पट होण्याची शक्यता आहे. व बियाणे उद्योगाच्या वाढीचा वार्षिक दर 12 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews